ग्रामपंचायत मालुंजे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

hero

ग्रामपंचायत माहिती

• ग्रामपंचायतीचे नाव – मालुंजे ता.इगतपुरी जि.नाशिक • ग्रा.प मधील वाडया वस्त्यांचे नाव :- मालुंजे वाडी • ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव :- श्री. संदीप धुडकू निरभवणे • प्रशासक नाव :- :- श्रीमती.वंदना अभिमन सोनवणे • ग्रा.पं. ची लोकसंख्या :- १२५९ (२०११च्या जनगणनेनुसार) • मतदार संख्या :- स्त्री ६३७ पुरुष ६२२ एकूण १२५९ • पाणीपुरवठा एकूण खातेदार :- २२० (मार्च २०२५ पर्यंत) • कुटुंबांची संख्या :- AAY :-४३ , APL:- १० , BPL :- ७५ , PHH :-११६ एकुण :- २४४

शिक्षण

मालुंजे गावांतर्गत जिल्हा परिषद शाळांची माहिती खालील प्रमाणे:
मालुंजे मध्ये ७ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे. मालुंजे वाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे. गावातील अंगणवाडी :- मालुंजे गावामध्ये एकूण एक व गावाला जोडलेल्या वाडी मध्ये एक अंगणवाडी आहेत. गावात नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे.दोन्ही अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे.

मालुंजे २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंडजनगणना माहिती
एकूण लोकसंख्या1259
घरांची एकूण संख्या211
महिला लोकसंख्या %50.5 % (529)
एकूण साक्षरता दर %45.6 % (478)
महिला साक्षरता दर %17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या %66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या %4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या %62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार53.1 % (110)

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
500
गृहसंख्या (घरांची संख्या):
200
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (24)
your paragraph text (25)
your paragraph text (26)
your paragraph text (27)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी