🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत
समाज मंदिर
समाज मंदिर
जिल्हा परिषद शाळा
मालुंजे येथे मालुंजे वाडी जिल्हा परिषद शाळा आहेत.या मध्ये मालुंजे मध्ये ७ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे. मालुंजे वाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे. गावातील अंगणवाडी :- मालुंजे गावामध्ये एकूण एक व गावाला जोडलेल्या वाडी मध्ये एक अंगणवाडी आहेत. गावात नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे.दोन्ही अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे.
वाचनालय
मालुंजे गावात १००० पुस्तकांचे मोठे ग्रंथालय असून प्रशासकीय भव्य इमारत देखील उपलब्ध आहे . याचा फायदा गावातून तरुणांना व आजू बाजू च्या सर्व विद्यार्थ्यांना व वाचन प्रेमीस होतो . स्पर्धा परीषेची पुस्तके , गाथा , येत्याषिक पुस्तके , गोष्ठी , दंत कथा अशी अनेक पुस्तके वाचनालयात उपलब्ध आहे . समाजाच्या विविध गरजापैकी वाचन ही एक अत्यंत महत्वाची गरज आहे, किंबहुना ती अन्न, वस्त्र, निवारा या गरजा इतकीच महत्वपूर्ण आहे. विकसनशील राष्ट्रातील समाज सुसंस्कृत व प्रगतशील होण्यासाठी त्याठिकाणची शालेय ग्रंथालये समृद्ध होणे काळाची गरज आहे. प्राचिन काळापासून आजपर्यंत ज्ञानाचे संप्रेषण विविध माध्यमातून होत असून त्यात मौखिक स्वरूपात, तर कधी झाडाच्या सालीवर, वीटावर, कातडीवर, कोळसा या साधनाद्वारे अक्षरे लिहून होत असे. छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळे पुस्तके प्रकाशनाचा वेग वाढला. ही प्रकाशित वाचनसाहित्य संपदा विविध प्रकारच्या ग्रंथालयामध्ये संग्रहित होऊ लागली. भारतात पुर्वी तक्षशिला, नालंदा, विक्रमशीला वल्लभी सारखी मोठमोठी ग्रंथालये अस्तित्वात होती. ही ग्रंथालये भारतातील व भारताबाहेरील विद्वानांचे लक्ष आकर्षून घेत होती. ही ग्रंथालये म्हणजे एक-एक विद्यापीठच होते. शालेय शिक्षणाचा काळ विद्यार्थी जीवनात फार महत्वाचा असतो. त्यादृष्टीकोणातून त्याना शिक्षण मिळाले पाहिजे. विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा हाच काळ असतो. त्यामुळे त्यांना भविष्याची ज्ञानरूपी शिदोरी मिळाली पाहिजे म्हणजे विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल होते. लहान वयात जेवढे संस्काररुपी वाचन होईल ते भाविष्यासाठी उपयोगी पडते. आज आपण पाहतो की ग्रामीण भागातील शाळेमध्ये फक्त रट्टामार शिक्षण दिले जाते. फक्त परीक्षाभिमुख पुस्तकातील अभ्यासक्रम शिकविला जातो. अवांतर वाचनाची पुस्तके वाचनासाठी दिली जातात ना शालेय ग्रंथालयात पुस्तके असतात. काही शालेय ग्रंथालयात पुस्तके असतीलही परंतु ती विद्यार्थी वाचतात ना शिक्षक, फक्त ग्रंथालयाच्या कपाटात बंद कुलुपात असतात. काही शाळेला ग्रंथपाल पद असते परंतु ते ग्रंथालयाचे काम करत नाहीत तर त्यांना शाळेच्या कार्यालयात लिपिकाचे काम करावे लागते म्हणून ग्रंथवाटपाचे कार्य ग्रंथालयात होताना दिसत नाही व ग्रंथ वाचकापर्यंत पोहचत नाही म्हणून शालेय विद्यार्थी वाचकांना अवांतर वाचनाची गोडी लागत नाही व त्याचे अवांतर वाचन होत नाही. शालेय शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थ्यापुढे परिस्थतीनुरूप दोन पर्याय असतात एक उच्चशिक्षणाचा आणि दुसरा उपजिविकेसाठी काही व्यवसाय करण्याचा. शालेय शिक्षणाच्या काळात विदयार्थ्यांना या दोन्ही पर्यायांना सामोरे जाता येईल, अशी त्यांची मानसिक तयारी झालेली असली पाहिजे. या काळात विदयार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक व भावनात्मक शक्तीचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी विदयार्थ्यांना ज्ञान संपादनाची विविध साधने उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. या साधनांचा उपयोग करण्याचे शिक्षणशाळांनी विदयार्थ्यांना दिले पाहिजे.
पाणी पुरवठा : टाकी
गावातील व वाडी वरील सर्व कुटुंबाना घरोघरी नळ उपलब्ध आहेत , पाणीपुरवठा रोज केला जातो, प्रा. आरोग्य केंद्र यांच्या कढून वेळोवेळी पाणी तपासणी केली जाते.
घरकुल योजना